मुंबई : शेतकरी संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनः विरोधकांवर फटकेबाजी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी पक्षाचे नेते फोडाफोडीचे राजकारण करून मित्रपक्षाच्या नेत्यांवर दबाव आणत आहेत, मात्र फुटणारे फुटतील ते पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांसारखे आहेत. अशी टीका अजित पवार यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता यावेळी केली. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या चाय पे चर्चा, मन कि बात या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम लावलाय, पण पहिल्यांदा कर्जमाफी करा मग तुमच्याशी काय बोलायचे ते बोलू असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.