मुंबई : अभिनेता अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आलाय. अक्षयने दुष्काळग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत केली आहे. याआधी त्याने ९० लाख रुपये दिले होते.


जलयुक्त शिवार अभियानासाठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारच्या मदतीमुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळालाय. अक्षयने जलयुक्त शिवार अभियानासाठी ५० लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करणार असल्याची घोषणा अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार ही मदत केली.


 


अक्षय कुमारने याआधी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल ९० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार तो महिन्याला १५ लाख अशी रक्कम सहा महिने देत आहे. 


यांनीही मदत केलेय?


दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्यास सुरुवात केली. तसेच नाम ही संस्था स्थापक केली. त्यानंतर अभिनेता आमीर खान, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे यांनीही दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय.