नवी मुंबई : नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या एक लाख पेट्याची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातून 50 हजाराहून जास्त पेट्या मार्केट मध्ये दाखल होत असून, हापूस आंबा 150 ते 300 रुपये डझन विकला जात आहे. तर कर्नाटकमधून साउथ  आंबा हा 50 हजार कॅरेट येत असतात. 


त्याचप्रमाणे केसर, तोतापुरी, राजापुरी सारखे आंबा मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामुळे आंब्याचे दर खाली उतरले आहेत. रत्नागिरी हापूस 15 मे पर्यंत सुरु असेल तर अलिबाग रायगड हापूस 31 मी पर्यंत संपणार असून ,त्यानंतर गुजरातचा हापूस मार्केटमध्ये दाखल होणार आहे.