अमिताभ यांचा मराठी भाषेला मानाचा मुजरा
एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत.
मुंबई : एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत.
कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेत ट्विट करुन मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी मराठी भाषेला ट्विटच्या माध्यमातून मुजरा केलाय.