COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(दीपक भातुसे, झी २४ तास) मुंबई : भारतात पहिल्या विमानाची निर्मिती करणाऱ्या मराठमोळ्या अमोल यादवांचं मुख्यमंत्र्यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमात तोंडभरून कौतुक केलं. 


अमोल यादव यांना खास स्टेजवर बोलावून त्यांच्या कार्याला सलाम केला. अमोल यादव यांना विमानाची निर्मिती करता यावी यासाठी पंतप्रधानांशी स्वत: बोलल्य़ाचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली. 


अमोल यादव यांना लवकरच सर्व परवानग्या देऊन त्यांची विमान निर्मिती सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.  देशात युवा शक्ती मोठ्या प्रमाणावर आहे असून त्याच्या जोरावर देशाची प्रगती वेगाने करू असंही त्यांनी नमूद केलं आहे.