मुंबई : मुंबईकर बॅडमिंटनपटू आनंद पवारला मलेशियाच्या झुलफादली झुल्किफ्लीने पराभूत केलं. यामुळे आनंद पवारला ब्राझिल ग्रांप्रीत उपविजेतेपद मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियाच्या झुलफादली झुल्किफ्लीकडून अंतिम सामन्यात आनंद पवारचा  21-18, 11-21, 17-21 असा तीन गेम्समध्ये पराभव झाला.


अव्वल मानांकित झुलफादलीनं जबरदस्त कमबॅक करुन पुढचे दोन्ही गेम्स आपल्या नावावर केले.


एक तास आणि वीस मिनिटं चाललेल्या या सामन्यात आनंद पवारनं पहिला गेम जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.