मुंबई : भारतातील अत्यंत नम्र, शांत आणि यशस्वी समाज म्हणून ओळखला जाणारा पारसी समाज आता काळाच्या ओघात आपल्या काही जुन्या परंपरांना मुठमाती देण्यासाठी तयार झालाय.


यापुढे मृतदेहांचं होणार दहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टॉवर ऑफ पीस' ही पारसी समाजातील वादग्रस्त प्रथा... पारशी समातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दहन किंवा दफन केला जात नाही. तर त्यांच्यासाठी 'टॉवर ऑफ सायलेन्स' बांधलेले असतात. मुंबईतील डोंगरवाडी इथं हे टॉवर ऑफ सायलेन्स आहे. याठिकाणी असलेल्या विहिरींमध्ये हे मृतदेह ठेवण्यात येतात... टॉवरच्या टोकाला प्रेत ठेवलं जातं... आणि त्यानंतर गिधाडं हे प्रेत खातात... त्यांची हाडं राहिपर्यंत वाट पाहून मग ती समुद्रार्पण केली जातात. 


वरळीत प्रार्थना भवन


परंतु, सध्या गिधाडांची संख्या घटत असल्याने अंत्यविधीसाठी पुरोगामी पाऊल उचलण्याचा निर्णय पारसी समाजातील काही पुरोगामी व्यक्तींनी घेतलाय. मुंबईतील गिधाडांची संख्या कमी झाल्याने शवांचे विघटन होण्याची प्रक्रिया सहा-सात महिने लांबते. म्हणून, मुंबई महानगरपालिकेला विनंती करून आम्ही वरळी येथील स्मशानभूमीतील एका जागेवर प्रार्थना भवन उभारण्याची विनंती केली. समाजातील दानशूर व्यक्तींकडून जवळपास दीड कोटींचा निधी उभा करून वरळीत एक मोठं प्रार्थना भवन बांधलं गेलंय. यासाठी समाजाच्या काही धर्मगुरुंनीही पुढाकार घेतलाय. हा निर्णय मान्य नसणाऱ्यांचा विरोध झुगारून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणणार असल्याचं या धर्मगुरुंनी म्हटलंय.