अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा - राज ठाकरे
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
मुंबई : अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली, तसेच बलात्कार करण्यांसाठी शरीयत कायदा लागू केला पाहिजे, त्यांचे हातपाय तोडण्याची शिक्षा त्यांना दिली पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
तसेच व्यसनाधिनतेमुळे अशा प्रकारचे बलात्कार आणि हत्या होत आहेत , हे न पटणार आहे, असं देखील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, हा कायदा रद्द करण्यात यावा, अॅट्रॉसिटीच्या गैरवापर होतोय किंवा नाही याचा अभ्यास करून, नवीन कायदा अस्तित्वात आणावा असं म्हटलं आहे.