निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसैनिकांची दगडफेक
उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व मधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक करण्यात आली.
मुंबई : उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व मधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारा विरोधात तक्रार केल्यामुळे, शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेसनं केलाय. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे, निरुपम यांची सभा उधळून लावल्याचा दावा शिवसेनेनं केलाय.
याप्रकरणी पोलिसांनी 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं गेलं. मात्र, थोड्या वेळातच तत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.