नवी मुंबई : नवी मुंबईतल्या दिघामध्ये 'झी २४ तास' पत्रकार व कॅमेरामन मारहाणी प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत चौकशी करण्यात येत आहे. 'झी 24 तास'च्या प्रतिनिधी स्वाती नाईक व कॅमेरामन संदीप भारती यांच्या समोर या आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. 


दरम्यान पोलीस ही कारवाई दाखवत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे मात्र या बाबत काहीच भाष्य करण्यास तयार नाहीत.