मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ केला होता, अशी कबुली २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी डेव्हिड हेडली याने बुधवारी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांकडून हेडलीची उलटतपासणी सुरु आहे. त्यावेळी त्याने ही माहिती दिली. बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला होता आणि तो अपयशी का ठरला, असा उलट प्रश्न अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी हेडलीला विचारला. त्याचा प्रयत्न अपयशी का ठरला, हे मला माहिती नाही. पण ज्या व्यक्तीकडे हे काम सोपविण्यात आले होते. तो मला माहिती होता, असे तो म्हणाला.


नंतर त्याला पोलिसांनी पकडले होते. पण तो पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता, असे हेडलीने सांगितले. भारतात आल्यावर आपण दोनवेळा शिवसेना भवनाला भेट दिली होती, असेही हेडलीने म्हटले. देशात लष्कर-ए-तोयबाने केलेल्या इतर हल्ल्यांबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर त्याने दिले.


तत्पूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती माझा सहकारी राणा आणि शिकागोमधील इमिग्रेशनचे काम करणारा पाकिस्तानी नागरिक या दोघांनाही होती, अशी कुबली हेडलीने दिलेय.