मुंबई : रेल्वे बोर्डाच्या धोरणामुळे मुंबईकरांना १२ नव्या लोकलना मुकावं लागतंय. जागतिक बँकेकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मिळणारं कर्ज रेल्वे बोर्डानं नाकारलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य पडल्यामुळे २०० कोटी रुपयांचं कर्ज अतिरिक्त ठरणार असल्याचं कारण बोर्डानं दिलंय. 


एमयूटीपी-२ साठी मिळणाऱ्या या कर्जाच्या रक्कमेतून लोकलचे १५२ डबे विकत घेतले जाणार होते. यातून हार्बर रेल्वेवर १२ डब्यांच्या १२ गाड्या चालवणं शक्य होणार होतं.


एमयूटीपी प्रकल्पात रेल्वे, राज्य सरकारप्रमाणेच जागतिक बँकेचा सहभाग आहे. नेमकं काय घडलं आणि २०० कोटींचं कर्ज का नाकारलं गेलं.