मुंबई : अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही योजना फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी असणार असणार आहे, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.


सध्या महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेक जण जखमी होतात. 


दरम्यान, अशा अपघातांतील जखमींच्या ऑपेरशन नंतर आवश्यक १२७ उपचार देखील नव्या योजनेत करण्यात येणार आहेत. योजनेतील नियमांचं पालन न केल्यास संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याचाही या योजनेत समावेश असणार आहे. 


तसेच लहान मुलांचे, वार्धक्यातील अनेक आजारावर सुद्धा या योजनेच्यामार्फत उपचार करण्यात येतील, असेही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितले आहे.