जीवाशी खेळणाऱ्या फटाक्यांवर कठोर कारवाई
राज्यात उघड्यावर फटाके विकले जातायेत त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणा-या अशा सर्व फटाक्यांच्या दुकानावर आणि विना परवाना फटाके विकणा-यांवर येत्या आठ दिवसात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
मुंबई : राज्यात उघड्यावर फटाके विकले जातायेत त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणा-या अशा सर्व फटाक्यांच्या दुकानावर आणि विना परवाना फटाके विकणा-यांवर येत्या आठ दिवसात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
तर सरकारी यंत्रणांनी पुढील ८ दिवसात काय कारवाई याचा अहवाल २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सादर करण्याचेही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
नाशिकचे चंद्रकांत लासुरे यांनी याबाबत दाखल याचिका दाखल केली होती. गेली ३ वर्षे चंद्रकांत लासूरे उघड्यावर फटाके विकणा-या विक्रेतांच्या विरोधात लढा देत होते.
उघड्यावर फटाके विकणे, विना परवाना फटाके विकणे, परवाना असलेले पण फायर सेफ्टीचे नियम न पाळणारे व्यापारी, रहिवाशी भागांत फटाके विकणा-या व्यापा-यांवर कडक कारवाई करा त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष ठेवा असे एकंदर आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
त्यामुळे आता उघड्यावर फटाके विकणारे आणि नियम न पाळणा-या दुकानांवर कारवाई केली जाईल.