प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली.  मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे.  त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष  बँकांना सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 डांगळे  कुटुंबियांनी आपले पैसे दुसऱ्या बॅंकेत आरटीजीएस मार्फत ट्रान्सफर केले आहेत, मात्र त्याही बॅंकेत अडीच लाख देण्याचे अजूनही आदेश आले नाही, त्यामुळे डांगळे आदेशाची वाट पाहत आहे.


 सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतल्यावर त्याची त्वरित अमंलबजावणी झाली. तशी नागरिकांना दिलासा देणाऱ्या घोषणांची अमंलबजावणी करण्यात यावी असे मत सामन्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.