मुंबई : तीन दिवसांच्या सुटीनंतर आज बँका सुरु होणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांना प्रथमच सलग तीन दिवस सुटी मिळाली त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी लागून आलेली ईदची सुटी यामुळे सलग तीन दिवस बँका बंद होत्या. या तीन दिवसांत पैशांसाठी नागरिकांना एटीएम मशिन्सचाच आधार होता. मात्र अनेक ठिकाणी एटीएम मशीनमध्येही पैसे नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. 


ज्या एटीएम मशिन्समध्ये पैसे होते त्याठिकाणी प्रचंड रांगा होत्या. या तीन दिवसांत आर्थिक व्यवहार कमालीचे मंदावले होते. तीन दिवसांनंतर बँका सुरु होणार असल्यामुळे आज पुन्हा बँका आणि एटीएम सेंटरबाहेर नागरिकांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.