मुंबई : हायवेवरील दारूविक्रीच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केला आहे. हायवे महापालिकेत वर्ग करण्यासठी दारू विक्रेते आपल्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांना नकार दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. एकीकडे पारदर्शकता म्हणून बोंबलायचं आणि दुसरीकडे स्वच्छ पाण्यात गढूळ पाणी ओतायचं, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी नकार दिल्यानंतर दारू विक्रेते एमएमआरडीएकडे गेल्याचंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. मुंबईतल्या समस्या आणि त्याच्यावरील उपाययोजना यासंदर्भात शिवसेनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग शिवसेनेतर्फे रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला.


मुंबईतील विकास आराखडा, झोपडपट्ट्यांचा विकास आणि शिवसेनेचा वचननामा यासंदर्भात मार्गदर्शन उद्धव ठाकरे आणि आयुक्त अजॉय मेहता यांनी मार्गदर्शन केलं.