वसई : अनेकांना गंडा घालणा-या बंटी बबलीला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन लाखात कोट्यवधी रुपयांचे डॉलर देण्याचं आमिष या दोघांनी एका टॅक्सी चालकाला दाखवलं. मात्र यांत काही तरी काळंबेरं असल्याचा संशय आल्यानं टॅक्सीचालकानं पोलीस स्टेशन गाठलं. सापळा रचून पोलिसांनी या दोघांना अटक केली.


मोहम्मद मुनीर हुसेन आणि सलमा आलम अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून अमेरिकन २० डॉलरच्या ८ नोटा जप्त केल्यात. याशिवाय काही नोटांची बंडलं जप्त केली असून त्यात फक्त कोरे कागद आढळलेत.