मुंबई : 21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोक्याला मुंडावळ्या आणि बाशिंग बांधून नवरदेवांची ही वरात निघाली होती मतदान केंद्रामध्ये. रत्नागिरीच्या पानवल गावातल्या महेश मांडवकरचं लग्न साडे नऊच्या मुहूर्तावर लागणार होतं, त्याआधी त्यानं व-हाडी मंडळींसह मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.


ठाण्यातल्या दिलीप खाडेचंही 21 फेब्रुवारीला साडे अकराच्या मुहूर्तावर लग्न होतं. पण खाडेंचं लग्नघरही आधी मतदान करायला पोहोचलं. नवरदेवानं करवलीसह मतदान केलं आणि मगच हे व-हाड लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलं. 


आधी लगीन मतदानाचं आणि मग स्वतःचं असं म्हणत या नवरदेवांनी आधी मतदान केलं. सप्तपदी चालण्याआधी सुजाण नागरिकाच्या कर्तव्याचं भान त्यांनी दाखवलंय.