पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट
![पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/11/12/205334-mumbaibestlogo.jpg?itok=raYvt_xB)
पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे.
मुंबई : पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बेस्टमध्ये वीज थकबाकीच्या रुपात ग्राहकांनी पाचशे, हजारच्या जून्या नोटा भरल्या.
नेहमी बेस्टमध्ये साधारण ३ कोटी रूपये वीजबिल रुपात जमा होत असतात. मात्र यावेळी वीज ग्राहकांनी रांगा लावून, थकबाकी भरली. यात विजेचा व्यावसायिक वापर करणा-या थकबाकीदारांची संख्या जास्त होती.