`बेस्ट` पगाराचा पेच तात्पुरता सुटला
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवलाय.
मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवलाय.
येत्या 21 आणि 22 तारखेला बेस्टच्या कर्मचा-यांना पगार दिला जाणार आहे. 185 कोटींची रक्कम देऊन 31 हजार कर्मचा-यांना येत्या 21 तारखेला तर 11 हजार कर्मचा-यांना 22 तारखेला त्यांचा पगार देण्यात येणार आहे.
तुर्तास हा खर्च स्वत: बेस्ट भागवणार असून पगाराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. महापौरांच्या दालनात शनिवारी यासंदर्भातली बैठक पार पडली.