मुंबई : बेस्ट बसचं तिकीट आता तुम्ही मोबाईलवरही काढू शकता. मुंबईकरांना दिवाळीनिमित्त बेस्टनं ही भेट देऊ केली आहे. उपनगरीय रेल्वेप्रमाणेच बेस्ट बसचं तिकीटही आता मोबाईलवर काढता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकेतस्थळावरूनही हे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. लवकरचं ऍप तुमच्या भेटीला येणार आहे. उत्तम सेवा, आणि प्रवासी संख्या वाढवण्याचं आवाहन समोर असलेल्या बेस्टचा हा निर्णय निश्चितच प्रवाशांसाठी चांगलाच म्हणावा लागेल. यासाठी संकेतस्थळात थोडेफार बदल केले जाणार आहेत.