दादरमध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस
दादर माहिम विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा, याला मोठं महत्त्व येणार आहे.
मुंबई : दादर माहिम विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा, याला मोठं महत्त्व येणार आहे.
तिन्ही पक्षांमध्ये यासाठी चांगलीच स्पर्धा पहायला मिळणार आहे. युती होण्यापूर्वीच्या समीकरणांनुसार या ठिकाणी शिवसेनेकडून मनोहर जोशी समर्थक पुन्हा सक्रीय झाले आहेत. तर दोन माजी महापौरांची नावे चर्चेत आहेत. यात मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांच्या नावांची चर्चा आहे.