मुंबई : भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड १२७ च्या भाजप उमेदवार रितु तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.


आचारसंहितेच्या काळात रितु तावडे यांनी मतदारांना भुलवण्यासाठी सोन्याची नथ आणि साड्या वाटप केल्याचा आरोप आहे. 21 जानेवारीचा साडी वाटपाचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र त्यावेळी आचारसंहिता लागू झाली होती.