मुंबईत भाजपची 195 जणांची यादी जाहीर,117 मराठी उमेदवारांना संधी
अखेर मुंबई महापालिकेसाठी भाजपनं काल रात्री उशिरा 195 जणांची यादी जाहीर केली. उरलेलल्या 32 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
मुंबई : अखेर मुंबई महापालिकेसाठी भाजपनं काल रात्री उशिरा 195 जणांची यादी जाहीर केली. उरलेलल्या 32 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
यात 117 मराठी उमेदवार असून 78 अमराठी उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आलंय. शिवसेनेतून कालच भाजपमध्ये दाखल झालेले प्रभाकर शिंदे, नाना आंबोलेंच्या पत्नी तेजस्विनी आंबोले, दिलीप उर्फ बबलू पांचाळ आणि त्यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश आहेच.
शिवाय आधीच स्पष्ट झालेल्या नावांमध्येही मोठ्या प्रमाणात घराणेशाही बोकाळल्याचं स्पष्ट होतंय.