मुंबई : मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं मध्यरात्री दीडच्या सुमारास निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयवंतीबेन मेहता गेल्या गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळानं राजकारणापासून दूर होत्या.. पण राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना त्यांनी नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा दीर्घ पल्ला गाठला होता. 


मुंबईत भाजप पाय रोवत असताना महिलांना पक्षाशी जोडण्याचं काम जयवंतीबेन मेहतांनी हिरीरीनं पार पाडलं.