मुंबई : गोरेगावमध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केली त्याच गोरेगावमधल्या एनएससी कम्पाऊंडच्या ठिकाणी, मुंबई भाजपनं विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केलंय. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा गुरुवारी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केलं होतं.


मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आजच्या विजय संकल्प मेळाव्यातच बोलणार असल्याचं त्यावेळी ट्वीट केलं होतं. तेव्हा या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार शिवसेनेचा कसा समाचार घेतात, काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पालिकेच्या स्वच्छ, पारदर्शी कारभाराचा मुद्दा भाजप पुन्हा या मेळाव्याद्वारे कसा मांडतो हे पाहणं सुद्धा यावेळी महत्त्वाचं ठरणार आहे.