मुंबई : मुंबईत बीकेसी ग्राऊंडवर शेवटची प्रचारसभा कुणाची होणार, हा वाद आता मिटलाय. बीकेसीऐवजी सोमय्या मैदानावर शेवटची प्रचारसभा घेण्याचा निर्णय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केलाय.


बीकेसी ग्राऊंडवर कुणी सभा घ्यायची यावरून शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना सुरू झाला होता. आम्ही मोठे भाऊ असल्यानं बालहट्ट पुरवतोय. बालीश माणसाचा बालहट्ट पुरवण्यासाठी भाजप शेवटची सभा सोमय्या मैदानावर घेईल, असं शेलार यांनी स्पष्ट केलंय.