मुंबई : भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहिरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रुपात जनतेसमोर आणला. मात्र, या जाहिरनाम्यावर शिवसेनेने जोरदार टीका करताना खिल्ली उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन झाले. याही जाहिरनाम्यात पाणी, रस्ते आरोग्य आणि सुविधांच्या सुलभीकरणावर भर देण्यात आला आहे. पाण्याचे दर स्थिर ठेवणार आणि जोपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजणार नाहीत, तोपर्यंत पथकर आकारणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे.


शिवसेनेनं मात्र खोदा पहाड निकला चुहां, अशा शब्दांत या जाहिरनाम्याची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे भाजपकडूनही शिवसेनेवर पलटवार होण्याची शक्यता आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी मुंबई पालिका निवडणूक अस्मितेची केली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष राहिले आहे.