आज मुंबई महापालिकेचं बजेट होणार सादर
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.
मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं 2017-18 चं बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडलं जाणार आहे. यंदाचं बजेट फुगवलेलं नव्हे तर वास्तववादी असणार आहे. त्यामुले मागील वर्षी असलेले 37 हजार कोटी रुपयांचं बजेट यंदा मात्र 30 टक्क्यांनी कमी असणार आहे.
शिवसेनेची सत्ता असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची छाप असण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणांचा अर्थसंकल्पात समावेश असू शकतो. 500 चौरस फुटांच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ तसंच 500 फुटांवरील घरांना मालमत्ता करात सवलत या बाबी प्रत्यक्ष अर्थसंकल्पात येतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जीएटी आल्यानंतर जकातीद्वारे मिळणारे उत्पन्न बंद होणार आहे त्यामुळे उत्पन्नाचे इतर मार्ग शोधावे लागणार आहेत.