मुंबई : रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. आचारसंहिता जवळ आल्यामुळं घाई झालेल्या महापालिकेनं 305 पैकी अनेक रस्त्यांची कामं आरोप असलेल्या कंत्राटदारांनाच देऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंत्राटदारांकडून कामं करून घेऊन त्यांचे पैसे राखून ठेवण्याचा निर्णय झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत एकूण ३०५ रस्त्यांची कामं बाकी आहेत. यापैकी अनेक रस्त्यांच्या कामाची कंत्राटं ठपका ठेवलेल्या १६ कंत्राटदारांना आधीच दिली गेली आहेत. त्यामुळे उर्वरीत रस्त्यांची कामे याच कंत्राटदारांकडून पूर्ण करवून घेतली जाणार आहेत. या ३०५ रस्त्यांपैकी शहर भागात ८३, पूर्व उपनगरांत ८८, पश्चिम उपनगरांत १३४ रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे.