मुंबई : मुंबईकर खड्ड्यांमुळं त्रस्त झाल्यामुळं आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत रस्ते गुळगुळीत करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले होते. मात्र या अभियंत्यांना मुंबईच्या जनतेशी काहीही सोयरसुतक नसल्य़ाचं स्पष्ट झालंय. कारण आज सोमवार असतानासुद्धा महापालिकेचं जी नॉर्थ कार्यालयात ओस पडलं होतं. या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला वाटेल की हे सर्व रस्त्यांची पाहणी करायला फिल्डवर गेले असतील...मात्र असं काही नाही...हे सर्व महाशय आपली ड्युटी सोडून चक्क दादरच्या ऍन्टिनो डिसिल्व्हा शाळेत क्रिकेट खेळायला गेले. अभियंते कर्मचारी सर्वच क्रिकेट खेळण्यात दंग होते. 


खड्डे बुजवण्याचं काम सोडून अभियंते क्रिकेट खेळताना दिसले.  सोमवारपर्यंत मुंबईतले खड्डे बुजवले जातील, असं आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी शनिवारी दिलं होतं. मात्र याचं काहीच सोयरसुतक अभियंत्यांना असल्याचं दिसलं नाही. याविषयी माध्यमांनी विचारणा केली असता अभियंत्यांची चांगलीच धावपळ झाली. 


कार्यालय पडले ओस