मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी खुशखबर
मुंबई महापालिकेच्या निवडणूका दृष्टीपथात आल्यानं मुंबईला चकाचक बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय...आचारसंहितेपूर्वीच महत्वाच्या कामांसाठी मंजूरी मिळवणं आणि ती कामं सुरु करणं हे लक्ष्य मुंबई महापालिका प्रशासनानं समोर ठेवलंय.
कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूका दृष्टीपथात आल्यानं मुंबईला चकाचक बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय...आचारसंहितेपूर्वीच महत्वाच्या कामांसाठी मंजूरी मिळवणं आणि ती कामं सुरु करणं हे लक्ष्य मुंबई महापालिका प्रशासनानं समोर ठेवलंय.
निवडणूकीआधी मुंबई होणार चकाचक..
326 रस्त्यांची कामे सुरु झाली असून 2515 कोटींची 1004 नविन रस्ते आणि २३ जंक्शनच्या कामालाही लवकरच सुरूवात
यावर्षीच्या रस्ते कामासाठी केलेल्या ३५७६ कोटींच्या तरतुदीपैकी आतापर्य़ंत ४४० कोटी खर्च झालेत.
मुंबईत ४५५ ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात,यावर कायमस्वरुपी उपाय करण्यासाठी ६४ कोटींचं टेंडर काढलंजाणार ते आचारसंहितेपूर्वी सुरु करणार...
रस्ते घोटाळ्यातील दोषी कंत्राटदारांना यापुढे कोणतंही काम दिलं जाणार नाही...मात्र, जुने कंत्राट दिले त्यावेळी राहिलेली १५० कामे याच कंत्राटदारांकडून पूर्ण करुन घेतली जाणार, त्यासाठीची बीले त्यांना दिली जाणार नाहीत. १७ नवीन कंत्राटदारांना १००० कोटींची कामं देण्यात आलीयत
- रस्ते गुळगुळीत करण्याबरोबरच मुंबईच्या मलनिस्सारणाचे, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवणयासाठीही बरेच वायदे केले गेलेत..
- गझदरबंध पंपींग स्टेशनचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्च 2017 पर्यंत पूर्ण करणार...
- माहुल मध्ये पंपींग स्टेशनचं काम यावर्षी सुरु होईल..
- मलजलप्रक्रीया केंद्र सुरु करणार...
- जवळपास 70 टक्के मलजल हे प्रक्रीया न करताच थेट समुद्रात जातंय. त्यामुळं ६ ठिकाणी असे प्रकल्प उभे केले जाणारेत
सत्ताधा-यांच्या दबावामुळं निवडणूकीच्या तोंडावर कोट्यवधी खर्च केले जातायत.