मुंबई : आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी विधानसभेतील पुरवणी मागण्यांबाबतच्या चर्चेत आदिवासी विभागातील साहित्यखरेदीतील गैरकारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले.आदिवासी आश्रमशाळांसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य किती निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबतचे पुरावे त्यांनी विधानसभेत सादर केले. पवार यांनी अध्यक्ष यांच्याकडे कारवाईची मागणी केली.


आदिवासी विभागाच्या माध्यमातून ५५२ आश्रम शाळा चालवल्या जातात. त्यापैकी २६० आश्रमशाळांना स्वत:च्या इमारती नाहीत. पोषण आहार, पिण्यास पाणी मिळत नाही, शाळांमध्ये शौचालये नाहीत, शौचासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागत आहे, या बाबी सभागृहाच्या निदर्शनास दिली.


यावेळी आदिवासी मंत्री रेनकोट घोटळ्यात अडकल्याचा थेट आरोप केला. पॅराशूट तेलाच्या बाटलीसारखी दिसणारी पण अधिक किंमतीची चीना या खोबरेल तेलाची खरेदी केली गेली. अंघोळीच्या साबणांबाबतही हाच प्रकार आहे. डायना या कंपनीचा साबण मुलांसाठी खरेदी केला. कपडे धुण्याचा साबण हा दिसायला 'रिन' कंपनी सारखा आहे. पण प्रत्यक्षात तो 'विशवॉश' नावाच्या कंपनीचा साबण मुलांना दिला जात आहे. कोलगेट सारखी दिसणारी अँकर कंपनीची टुथपेस्ट मुलांना दिली जात आहे. हे सर्व साहित्य बोगस आणि निकृष्ट दर्जाचे आहे, असे अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.


पाहा अजित पवार काय म्हणालेत?