मुंबई : मुंबईची लाइफ लाईन म्हणजेच लोकल ट्रेन... आता या लोकल ट्रेनमध्येही लवकरच एसी दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणजेच, मुंबईकरांचा प्रवास सुखमय होण्याची आशा आहे. पण ट्रेन कमी आणि लोक जास्त त्यामुळे नेहमीच लोकल ट्रेन भरलेल्या असतात, त्यामुळे खूप लोकांनी जीव गमावलेत. मग कोणत्या नव्या गोष्टींनी एसी ट्रेनचा प्रवास सुखमय हा सुखमय होईल? 


आरपीएफ जवान तैनात 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीवर ताबा ठेवण्यासाठी आरपीएफच्या जवानांसोबत बाऊन्सर्स लोकल ट्रेनमध्ये तैनात करण्यात येणार आहे. 


लोकल ट्रेनची क्षमता ही १,८०० प्रवाशांना घेऊन जाण्याची आहे, पण तसं न होता एका ट्रेनमध्ये जवळपास ८,००० लोक प्रवास करतात... अनेक जण दरवाजातही लोंबकळताना दिसतात... याचमुळे अनेकांनी जीवही गमावलाय. मुंबईत एसी ट्रेन सुरु झाल्या तर अर्थातच त्याचे दरवाजे बंद ठेवावे लागणार...


केंद्रीय सुरक्षा उपायुक्त सचिन भालोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसी लोकल ट्रेनची सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत. या लोकल ट्रेनमध्ये ४५०० प्रवासी दररोज प्रवास करु शकतील. मात्र, या लोकल ट्रेनचं भाडं निश्चित करण्यात आलेलं नाही.  


बाऊन्सर्सना दिली जाणार ट्रेनिंग


मुंबईला एसी लोकल ट्रेनची अजून सवय नाहीय... त्यामुळेच एसी लोकलचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी बाऊन्सर्सना ट्रेनिंगही दिली जाणार असल्याचं भालोडे यांनी म्हटलंय.