मुंबई : एकीकडे दिघावासियांना दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय, तर त्याच न्यायालयाच्या आदेशाला मंत्री कसे जुमानत नाहीयेत, याचं उदाहरण समोर आलंय. चक्क गृहनिर्माण मंत्र्यांनी अडथळा आणत कारवाई रोखली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीवर असलेली बांधकामं पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. त्यानुसार आज महापालिकेची पथकं विद्याविहार इथं गेली असता स्थानिकांनी त्याला विरोध केला. खुद्द गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता कारवाई रोखण्यासाठी तिथं दाखल झाले. मेहता यांनी नागरिकांना दुसरी पर्यायी जागा द्यावी तसंच पावसाळा होईपर्यंत बांधकामं पाडू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन लावला.


खरंतर या रहिवाशांना माहुल इथं जागा देण्यात आलीये. मात्र तिथं जायला हे लोक तयार नाहीत. मागच्या वेळेसही महापालिकेच्या पथकांवर दगडफेक झाली होती. मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आजही कारवाई न करताच पथकांना माघारी फिरावं लागलंय.