मुंबई : विधीमंडळात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 2017-2018 च्या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर 2016-17 या आर्थिक वर्षाचं अर्थिक सर्वेक्षण शुक्रवारी विधीमंडळात सादर करण्यात आलाय. राज्याच्या दरडोई उत्पन्न, कृषी उत्पन्नात वाढ झालीय. पण वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट दिसतंय. राज्याच्या स्थूल उत्पन्नात तब्बल 9 टक्क्यांची वाढ झाल्याचं सर्वेक्षण दाखवण्यात आलीय.


रब्बी हंगामात उत्पादनात विक्रमी वाढ झाली. या अर्थसंकल्प आणि आर्थिक पहाणी अहवालावर मुनगंटीवार आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अखेरचा हात फिरवला. कर्जमुक्ती व्हावी अशी आमची दोघांचीही इच्छा आहे. त्यासाठी योग्य तो मार्ग शोधावा लागले. तसेच अर्थसंकल्प मांडताना विरोधक सहकार्य करतील अशी आशाही मुनगंटीवारांनी आशा व्यक्त केली.