मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्यावरून लक्ष्य करण्याची रणनिती आखली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलकही दाखवली.


अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी शेतक-यांची कर्जमाफी आणि हमीभावासाठी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य पालांच्या अभिभाषणानं राज्याच्या जनतेची घोर निराशा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सरकारनं शेतक-यांचा विश्वासघात केल्याचाही हल्लाबोल त्यांनी केला. मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यात तब्बल 117 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय. त्यामुळं हे अधिवेशन शेतक-यांच्या मुद्यावरच गाजणार असल्याचं दिसतं आहे.