मुंबईत इमारत कोसळून 5 ठार
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा भागातील तीन मजली गुलमोहर बिल्डिंगचा काही भाग कोसळला.
मुंबई: दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा भागातील तीन मजली गुलमोहर बिल्डिंगचा काही भाग कोसळला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली.
या इमारतीच्या ढिगा-यात अडकलेल्या तिघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं असून आता बचावकार्य संपलेलं आहे. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळलीयाची चौकशी सुरु आहे.
दरम्यान या इमारतीच्या तळमजल्यावर बियरचं दुकान होतं आणि या दुकानात रिपेअरिंगचं काम सुरु होतं असं बोललं जातंय.