मुंबई : स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहातुक कोंडी झाली. चांदिवली बॅक ऑफ इंडिया जवळ ही घटना घडली. बोरीवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी झाली होती. 


नागपुरातही बर्निंग कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नागपुरात पूनम चेंबर भागात एकच खळबळ माजली, जेव्हा एका धावत्या कारनं पेट घेतला. अक्रम नावाच्या व्यक्तीची ही कार होती आणि दुरुस्तीकरता एका गॅरेजमध्ये पाठवली होती. दुरुस्त झाल्यावर गॅरेजचा मेकॅनिक टेस्ट राईडकरता ती गाडी घेत त्रस्त्यावर गेला असताना पूनम चेंबर जवळ कारने पेट घेतला. 


सुरवातीला छोट्या वाटणा-या या आगीनं नंतर भव्य रूप घेतलं. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही.