सेना-भाजपमध्ये पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता
भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्यानं शिवसेना नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं शपथविधीवर शिवसेना बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. शिवसेनेची राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अद्याप काहीही ठरलं नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
उद्याच्या विस्तारात शिवसेनेनं 2 जागा मागितल्याची चर्चा होती. मात्र जे द्यायचं ते सन्मानानं द्या, लाचार होऊन कोणासमोर जाणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजप शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.