मुंबई : नालासोपारा येथून आयकर विभाग आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त छापेमारी करत जवळपास 1 कोटी पेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त केली आहे.


शिवसेना उपजिल्हा प्रमुख तसेच वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याकडून 1 कोटी पेक्षा अधिकची ही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 45 लाखांच्या नव्या नोटा तर 60 लाखांच्या 500 च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या कार्यालयात याबाबत अजून चौकशी सुरु आहे.