मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या रेल्वेच्या मध्य रेल्वेतल्या प्रवाशांच्या गर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये घट झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेनं वाढवलेल्या गाड्यांच्या फे-या, तसंच डब्यांचीही वाढवलेली संख्या, यामुळे रेल्वे गाडीतलं गर्दीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय. २००७ - २००८ मध्ये मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांची संख्या ३५ लाख इतकी होती. हाच आकडा आठ वर्षांनंतर तब्बल ८२ लाखांच्या घरात पोहोचला आहे. 


२००७ - ०८ मध्ये एका डब्यातली प्रवाशांची सरासरी संख्या २९३ होती. ती आठ वर्षांमध्ये घटून २०९ इतकी झाली आहे. पूर्वी ९ डब्यांच्याच असलेल्या गाड्या, या काळात आधी १२ आणि आता १५ डब्यांच्या झाल्या आहेत. त्यामुळे गर्दीतही घट झाली आहे.