मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  


मध्य रेल्वे-दादर माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला गेलेला तड़ा दुरुस्ती काम 8.15 मी पूर्ण करण्यात आले आहे.
 
 दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रुळ तुटल्यामुळे फास्ट डाऊन मार्गाची वाहतूक तब्बल 2 तास ठप्प होती. 
 
 यामुळे फास्ट तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या होत्या. संध्याकाळच्या वेळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांना यामुळे मोठा फटका बसला... 
 
 अनेक स्टेशनांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती... आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.