मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या हालाचं सत्र संपता संपत नाहीये. आज पहाटेच्या भिवपुरीला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची मुंबईला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीय.
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या हालाचं सत्र संपता संपत नाहीये. आज पहाटेच्या वेळेस भिवपुरीला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची मुंबईला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीय.
त्यानंतर बदलापूरमध्ये रोज उशिरानं येणाऱ्या गाड्यांमुळे संतप्त प्रवाशांनी दोन्ही बाजूंची वाहतूक अडवलीय.
या उत्स्फूर्त रेलरोकोमुळे मध्यरेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी उशिरानं होत असल्याची उद्घोषणा जवऴपास सर्वच स्टेशनवर सुरू आहे.