मुंबई : मध्यरेल्वेच्या भायखळा स्थानकातल्या पादचारी पुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते रविवारी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत हा विशेष मेगाब्लॉक असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सँडहर्स्ट रो़ड ते करी रोड या स्थानकांदरम्यान हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकलच्या वेळांत बदल करण्यात आला आहे.


यापूर्वी मध्य रेल्वेवरून जाणारा एक पूल हटवण्यात आला होता, तेव्हा देखील काही तास विशेष मेगाब्लॉक राबवण्यात आला होता.