मुंबई : आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळांना मिळणा-या विशेष वागणुकीबद्दल आणि सवलतींबद्दल अंजली दमानियांनी जेल विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली तक्रार केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगात छगन भुजबळांना टिव्ही, आवडणारे अन्न, दर दोन तासांनी फळं, अशा सुविधा दिल्या जातात असा दमानियांचा आरोपा आहे. तर समीर भुजबळांना शहाळ्यातून विदेशी मद्य दिलं जात असल्याचंही दमानियांनी तक्रारीत म्हटलं आहे.  


समीर भुजबळ दिवसातून तीन तास मोबाईलवर बोलण्याची मुभा देण्यात आली आहे असाही दामानियांचा दावा आहे.  वारंवार याविषयी तक्रारी करूनही काहीच परिणाम होत नसल्याचं दमानियांनी म्हटलं आहे.