मुंबई : टोलमाफीचा नवा फॉर्म्युला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितला. प्रश्नोत्तराच्या तासात कोल्हापुरातील अंतर्गत टोल बंद करण्यात आल्याची माहिती चंद्र्कांत पाटील यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावर बारामतीमध्ये अंतर्गत टोलनाके सुरू आहेत, ते बंद करावे अशी मागणी अजित पवार यांनी केली. मात्र कोल्हापुरातील जनतेच्या आंदोलनाचा रेटा मोठा होता, त्यामुळे तिथे टोलमाफी करण्यात आली, तुम्ही बारामतीमध्ये मोठं आंदोलन करा टोल माफ करू असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केलं.


आंदोलन करा आणि टोलमाफी मिळवा असा टोलमाफीचा नवा फॉर्म्युला पाटील यांनी आज विधानसभेत सांगितला.