मुंबई : नारायण राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे... पण, त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल प्रदेशाध्यक्ष स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतील, भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन 'मातोश्री'वर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय.


मध्यावधी निवडणुकीचीही नुसतीच चर्चा असून 200 संख्याबळ असताना काँग्रस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं दादांनी स्पष्ट केलंय.


भारतीय जनता पार्टी आणि सेनेमधल्या कटुतेची तीव्रता कमी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील गुडीपाडव्याच्या नंतर 'मातोश्री'वर जाणार असल्याच्या बातम्या सुरु होत्या... याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलंय.