काँग्रेसचाही गुजराती मतांवर डोळा ?
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र आंबेरकरांची उचलबांगडी करण्यात आलीय.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र आंबेरकरांची उचलबांगडी करण्यात आलीय. त्यांच्याऐवजी काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदाची माळ प्रवीण छेडा यांच्या गळ्यात घातलीय.
यामुळे मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान सुरू होण्याची शक्यता आहे. कारण आंबेरकर हे गुरूदास कामत गटाचे मानले जातात. आंबेरकर सत्ताधा-यांविरोधात प्रभावी ठरत नसल्यामुळेच त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आहे. तर प्रवीण छेड़ा हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई काँग्रेस आणि नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी निर्माण होऊ शकते.
तर दुसरीकडे भाजपचे गटनेते मनोज कोटक हे गुजराथी आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठीच गुजराथी भाषिक छेडांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे.